Header Ads Widget

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलकावर पोलिसांचा लाठी चार्ज झाल्या पासून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय !!

       माधव पवार 
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलकावर पोलिसाचा लाठीचार्ज झाल्या पासून नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सादर करून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय झाले आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी गेल्या दोन महिन्या पूर्वी नायगाव तालुक्यातून प्रथम उमेदवारी मिळवण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या कडे अर्ज दाखल केला होता

त्या धरतीवर नायगाव विधानसभा मतदार संघाची उमेदवारी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी द्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे 

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलकावर पोलिसांचा लाठीचार्ज झाल्या पासून नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर त्यांच्या पदाचा राजीनामा त्यांच्या पक्षाकडे सादर केला असल्याचे सांगण्यात येत आहे 

सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सदरच्या आंदोलनात सहभागी होऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत काम करण्याची तयारी तेव्हा पासून दर्शविली आहे 

नायगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी होटाळकर यांना देणे आवश्यक असल्याचे ही विविध समाजातुन मागणी केली जात आहे 

Post a Comment

0 Comments