तालुक्यातील मौजे एकघरी येथे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुरू आहे त्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत एकूण विद्यार्थी २२४त्या मध्ये ८६ मुले आणि १३८मुली शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना किनवट आदिवासी विकास विभागामार्फत अनेक सुविधा पुरविल्या जात आहेत पण येथील विद्यार्थ्यांना मा.मुख्याध्यापक: बी.एस. कंचले मॅडम व अधीक्षक पि.डी.खैरे यांच्या कडून सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप किसान सेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश जाधव व उपस्थित विद्यार्थ्यांनी केला आहे या बाबत सविस्तर वृत्त असे की आदिवासी आश्रम शाळा म्हटले की त्या विद्यार्थ्यांच्या नशिबी येते ती उघड्यावरची आंघोळ, दूषित पाणी, फरशीवर झोपणे व निकृष्ट जेवण आतापर्यंत शासनांने दिलेला कोट्यावधीचे अनुदान हडपण्याचा प्रकार या आदिवासी आश्रम शाळेतून होत असल्याचे दिसून येत आहे या शाळेमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही दूषित पाणी देऊन येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी अधीक्षक व मुख्याध्यापक खेळत आहेत कोट्यावधीचे अनुदान हडपण्याचा प्रकार येथे सुरू असल्याचे वास्तव चित्र विद्यार्थ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे या विद्यार्थ्यांना दररोज जेवणामध्ये अंडी, केळी, दूध असे कुठलेही प्रकार दिले जात नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पोषण आहार कोणाच्या पोटात जात आहे असा प्रश्न येथील सुजाण नागरिक व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे याची उच्चस्तरीय चौकशी किनवट प्रकल्प अधिकाऱ्यांनी या शाळेस भेट देऊन करावी व संबंधित दोषीवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून या विद्यार्थ्यांना तात्काळ भौतिक सुविधेसह त्यांच्या स्वच्छतेची व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करून द्यावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे व या शाळेतील मुख्याध्यापक बी.एस. कंचले व अधीक्षक पी. डी.खैरे यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून या आदिवासी आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांना दररोज त्यांच्या पोषक आहारामध्ये अंडी, दूध, केळी व पौष्टिक जेवण देऊन येथील विद्यार्थ्यांच्या संडास, बाथरूमची समस्या दूर करून देण्यात यावी अशी मागणी किसान सेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश जाधव यांनी केली आहे

0 Comments