Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघांचे भावी आमदार मा. शिवराज पाटील होटाकर, डॉ मीनलताई खतगावकर, डॉ माधवराव विभुते यांच्यात लढत होणार ?

      माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघांचे भावी आमदार मा. शिवराज पाटील होटाकर, डॉ मीनलताई खतगावकर, डॉ माधवराव विभुते यांच्यात लढत होणार असल्यामुळे सदरचे हे भावी आमदार अनेक महिन्या पासून विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी तयारी केले आहे 

८९ नायागांव विधानसभा मतदार संघाची निवडणूक मोठया ताकतीने लढविण्यासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातुन नायागांव मतदार संघ हा पिंजून काढला आहे 

याच मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांनी भाजपाला सोडचिट्ठी देऊन नायगाव विधानसभा मतदार संघ लढविन्यासाठी सज्ज झाल्या आहेत 

नायागांव विधानसभा मतदार संघात अनेक भावी आमदाराची संख्या वाढली असल्यामुळे डॉ माधवराव विभुते यांनी सुद्धा सदरची निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments