Header Ads Widget

पुढारी असावा असा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या माध्यामातून अनेक अनाथ बालकाना व बालिकांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ !!

       माधव पवार 
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच राजकीय नेते मंडळीच्या परिचयात असलेले व नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याने त्यांच्या कार्याचा जनतेतून गौरव करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या माध्यामातून अनेक अनाथ बालकाना व बालिकांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ मिळाला असल्यामुळे पुढारी असावा असा अशी चर्चा करत पाटील यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आहे 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सदरचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी गोरगरीब लोकांचे फॉर्म भरून करून घेऊन सदरील मंजुरी करून घेतली आहे 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार असो की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस असो त्याच बरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार असो यांच्या सानिध्यात राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी गोरगरीब जनतेचा आधार बनले आहेत 

राजकीय पुढार्‍यांचे वाढदिवस साजरे करत असताना अशा महत्त्वाच्या उपक्रमाची सुरुवात व अंमलबजावणी केली तर गोरगरीब जनतेचा फायदा होऊ शकतो अशा पद्धतीचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविले असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे 

Post a Comment

0 Comments