नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गोदावरी काठावर असलेल्या शेतात व त्या परिसरात वाघ असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत असली तरी या गावात एका घोड्यासह तीन कुत्रे ठार तर एक गाय जखमी झाली ही सदरची घटना आज्ञात ( वाघ ? )प्राण्याच्या हाल्यात ठार झाले असल्याची गावकऱ्याची शंका आहेतालुक्यातील बरबडा अनेक वेळ वेळा कोणी आजगर पाहिलो म्हणतो तर कोणी वाघ आला असल्याची अधून मधून अफ़वा केली जाते परंतु नेमका काय प्रकार असू शकतो वनपरीक्षेत्र अधिकारी देगलूर / बिलोली यांनी चौकशी केली का ? हा महत्वाचा प्रश्न आहे बरबडा येथे घडलेल्या दोन ते तीन दिवसात एका घोड्यासह तीन कुत्रे ठार तर एक गाय जखमी झाली असली तरी तिला प्राण्याच्या पायाचा पंजा मारल्याच्या जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे
या विभागात वनविभागात कार्यरत असलेले अधिकारी झोपेत का ? अशी चर्चा रंगली असून सदरच्या अधिकाऱ्यानी बरबडा येथे जाऊन चौकशी करावी अशी मागणी होताना दिसून येत आहे
वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर व बिलोली यांनी गावकऱ्यांत झालेली भीती दूर करण्यासाठी व सदरच्या प्राण्याचा शोध घेण्यासाठी बरबडा येथे जाऊन सदरच्या घटनेची पाहणी करावी अशी मागणी जन सामान्य माणसातून होत आहे
सदरील अधिकाऱ्यानी वाघ की कोल्हा लांडगा की बिबट्या अथवा तडस यांचा शोध घेऊन सदरचे बरबडा गाव भीती मुक्त करावे अशी मागणी होत आहे

0 Comments