Header Ads Widget

साहेब : आम्ही सोबत आहोत विधानसभा निवडणूक लढवा - मा. शिवराज पाटील होटाळकर यांना जनतेचा पाठींबा !!

        माधव पवार 
जनतेच्या मनातील भावी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती मा. शिवराज पाटील  होटाळकर यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनसामान्य माणसासह मतदारांच्या मनात ठसले आहे 
येत्या विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात साहेब तुम्ही निवडणूक लढवा आम्ही तुमच्या सोबत आहोत असी जन भावना नायगाव विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी जोरदार तयारीला लागले असल्यामुळे या मतदार संघातील जनतेचा मोठा पाठिंबा त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद घेऊन उभा राहिला आहे 
भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी या मतदार संघाचा विकास करण्यासाठी सदरच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामासाठी जनतेच्या व मतदाराच्या आशीर्वादाने लंगोट घातली आहे 

जन आशिर्वाद दौऱ्याच्या निमित्ताने सिरसखोड तालुका धर्माबाद येथे भेट देण्यात आली आहे 

यावेळी गावातील प्रतिष्ठित आणि युवा कार्यकर्ते नारायण पाटील पवार राजु शंकर पवार साईनाथ माधव लंगोटे साईनाथ हनुमंत रेवने गंगाधर पाटील जाधव फिरोज शेख मनसुग बेग देविदास पवार गफार बेग (सरपंच) देविदास माधव पवार किशन पाटील शिंदे विशाल सज्जन नाहहोदिन बेग नय्यर खान देवराव पवार उपस्थित होते

एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे हळूहळू ग्रामीण भागात वाहू लागले असल्याने या नायगाव मतदार संघातील नायगाव धर्माबाद उमरी तालुक्याच्या खेड्यापाड्यात माननीय शिवराज पाटील होटाळकर यांचे नेतृत्व कायम आहे 

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाकर यांच्या माध्यमातून सदरची नायगाव विधानसभा निवडणूक सरळ सरळ जिंकता यावी म्हणून शिवराज पाटील यांच्यासह त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार तयारीला लागले आहेत  


Post a Comment

0 Comments