राज्यात विधानसभेच्या निवडणूका जवळ जवळ येत असल्यामुळे नायागांव विधानसभा मतदार संघात भावी आमदाराची धावपळ वाढली असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
शेतकऱ्यांना गेल्या वर्षाचा पीक विमा मिळाला नाही तो पीक विमा शेतकऱ्यांना मिळवन देण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत परंतु विधानसभेच्या निवडणुका लढविण्यासाठी मात्र गावा गावात जाऊन मतदाराच्या भेटी घाटी घेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
एकीकडे राज्यात सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुद्धा प्रलंबीत असताना सुद्धा त्या कडे सुद्धा लक्ष देण्यास कोणता ही आजी आमदार नायागांव विधानसभा मतदार संघात मताची व मतदाराची मनमिळवनी करण्यासाठी मोठी धावपळ करत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे

0 Comments