Header Ads Widget

नांदेड जिल्ह्यातील अवैध धंदे संपूर्ण बंद करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक चालूच राहणार आयपीएस अबिनाश कुमार !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे सुपर पावर पोलीस अधीक्षक आयपीएस 
अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्ण पणे बंद करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक चालूच राहणार असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूजशी पोलीस अधीक्षक कुमार यांनी दिली आहे 

जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले होते त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गुटखा बंदीची मोहीम हाती घेतली आणि जवळ पास ९५ टक्के पोलीस अधीक्षकाची मोहीम यशस्वी झाली आहे 

नांदेड जिल्ह्याचा पदभार स्वीकारण्याच्या नंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या धास्तीने अवैध धंदे करणाऱ्यात चांगलीच धडकी भरली आहे 

सदरच्या मोहिमे अंतर्गत संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखासह पोलीस कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळून धंदे करणाऱ्या वर लक्ष ठेवून आहेत 

जिल्ह्याचे सुपर पॉवर आयपीएस अबिनाश कुमार यांनी सदरची गुटखा बंदी व अवैध धंदे  बंद करण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे गुटखा खाणाऱ्याची व अवैध धंदे करणाऱ्याची चांगलीच पाजगत झाली असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments