नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघात अनेक पक्षाचे राजकीय पुढारी सदरची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले असले तरी वंचित बहुजन आघाडी कडून अद्याप तरी कोणी हात वर केले नसल्याचे स्पष्ट चित्र नायागांव विधानसभा मतदार संघात दिसून येत आहे
राज्यातील वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आपले उमेदवार लोकसभा असो विधानसभा असो अथवा जिल्हा परिषदेच्या निवडणूका असो आपले उमेदवार हुभे करून राज्यातील राजकीय नेते मंडळीला चांगलाच घाम फोडतो परंतु नायागांव विधानसभा मतदार संघात मात्र अद्याप तरी निवडणूक लढविण्यासाठी हात वर केला नसल्याचे सरळ सरळ दिसून येत आहे
वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख बॅरिस्टर तथा ॲड प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष राज्यात मोठा बलशाली होत आहे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो की राष्ट्रीय नेते राहुल गांधी असो अथवा महाराष्ट्र राज्यातले राजकीय नेते मंडळीला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे पक्ष प्रमुख शरद चंद्रजी पवार असो की या राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो यांना कोणत्या ही निवडणूकीत घाम सुटतो आहे
भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे खासदार अशोकराव चव्हाण असो अशा नामांकित राजकीय पुढाऱ्याना वंचित बहुजन आघाडीचा नक्की झटक बसतो परंतु सध्याच्या परिस्थित नायागांव विधानसभा मतदार संघात मात्र वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाला नाही असे चित्र दिसून येत आहे

0 Comments