Header Ads Widget

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते १७ सप्टेंबरच्या पूर्व संदेला बँक खात्यात जमा करा -लाभा पासून शेकडो बहिणी वंचित !!

        माधव पवार 
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलाचे निवडणुकीत मोठया प्रमाणात मत परिवर्तन करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली आणि शेकडो महिलाना राखी पौर्णिमेच्या अगोदर त्या योजनेचे बहीण्याच्या बँक खात्यात तीन हजार पडले आहे 

राज्यात काही दिवसात विधानसभेच्या निवडणूका लागणार असल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेला विशेष महत्व देण्यात आले असले तरी शेकडो लाडक्या बहीण्याच्या बँक खात्यात एक ही रूपडा आला नसल्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दीनाच्या म्हणजे १७ सप्टेंबर २०२४ रोजीच्या पूर्व संदेला लाडक्या बहीण्याच्या बँक खात्यात ४५०० रुपये जमा करावेत अशा पद्धतीची मागणी सदरच्या महिला वर्गातून होत आहे 

राज्यासह ग्रामीण भागातील महिला वर्ग मोठया प्रमाणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म दाखल केले आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ही पात्र माझी लाडकी योजने पासून वंचित ठेवणार नाही अशी घोषणा केली आहे 

परंतु अद्याप शेकडो महिलाच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नसल्यामुळे लाडक्या बहीण्या नाराज असल्या तरी येणाऱ्या निवडणुकीत हप्ते नाही टाकल्यास नक्कीच परिणाम होणार यात काही शंका नाही असे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते १७ सप्टेंबरच्या पूर्व संदेला बँक खात्यात जमा करा -लाभा पासून शेकडो बहिणी वंचित आहेत 

Post a Comment

0 Comments