Header Ads Widget

सावरखेड येथील आंबादास वानखेडे हा घरातून निघून गेला : कोणाला आढळून आल्यास संपर्क करावा नातेवाईकाची विनंती !!


           माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे सावरखेड येथील रहिवासी असलेले आंबादास पांडुरंग वानखेडे वय ४२ वर्ष व्यवसाय मजुरी हा घरातून दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी घुंगराळा व महादेवाला जाऊन येतो म्हणून निघून गेला असल्यामुळे तो अद्याप घरला आला नसल्यामुळे सर्वत्र नातेवाईकाकडे शोध घेऊन सुद्धा मिळून आला नाही त्यामुळे सदरचा आंबादास कोणाला आढळून आल्यास संपर्क करावा अशी विनंती नातेवाईकानी केली आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सावरखेड येथील रहिवासी असलेले अंबादास पांडुरंग वानखेडे यांचे नातेवाईक अनेक ठिकाणी शोध घेतल्या नंतर त्यांच्या पत्नी सविता अंबादास वानखेडे यांनी स्वतः पोलीस स्टेशन कुंटूर येथे हजर होऊन सदरची माहिती दिली असून सदर व्यक्तीच्या संपर्कासाठी मोबाईल नंबर ८४०८८१४६१५, ९९२३१२४५७४, ८०१०१२२९०८ संपर्क करावा अशी त्यांच्या नातेवाईकाची विनंती आहे 

सावरखेड येथील अंबादास पांडुरंग वानखेडे यांचे थोडक्यात वर्णन उंची ५. ३ इंच रंग गोरा नाक सरळ त्यांचे शिक्षण इयत्ता पाचवी त्यांना हिंदी व मराठी बोलता येते अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट तसेच काळा पॅन्ट तर त्यांची नेहमीची सवय समोरच्या व्यक्तीला स्वतःहून बोलतो व त्यांच्या जवळ कार्बनचे मोबाईल असले तरी त्यात कोणते ही चालू सिम नाही असे सांगण्यात येते आहे 


Post a Comment

0 Comments