Header Ads Widget

श्री गणरायाचे विसर्जन करताना गणेश मंडळानी तलावातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन विसर्जन करावे - पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आवाहन !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्यात सर्वत्र श्री गणरायाचे आज विसर्जन होत असल्यामुळे सर्व गणेश मंडळानी गोदावरीचे पात्र असो की छोटे मोठे तलाव असो अथवा खदानी असो किंवा विहिरी असतील त्या ठिकाणी श्री मंगल मूर्तीचे विसर्जन करीत असताना सर्वांनी सदरच्या पाण्याची पातळी लक्षात घेऊन गणरायाचे विसर्जन करावे असे नांदेड जिल्ह्याचे आयपीएस अबिनाश कुमार यांनी केले आहे 

जिल्ह्यात श्री गणेश विसर्जनाच्या निमित्ताने प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून सदरच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी काही अनुचित प्रकार घडू नये या साठी सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक असल्यामुळे सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे जिल्ह्याचे सुपर फास्ट पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार असे सुद्धा आवाहन केले आहे 

नांदेड जिल्ह्यात मोठया प्रमाणात श्री गणरायाचे विसर्जन करताना गणेश मंडळानी तलावातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन विसर्जन करावे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आवाहन करण्यात आले आहे 

जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रामुखानी सुद्धा श्री गणरायाचे विसर्जन करताना लक्ष द्यावेत असे ही पोलीस अधीक्षक कुमार यांनी सुचविले आहे 

Post a Comment

0 Comments