Header Ads Widget

जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाणे प्रमुखांनी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात हुलडबाजी करणाऱ्याची गैय करू नये - पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मंगलमूर्तीच्या स्थापना करण्यात आले असल्यामुळे सदरचा उत्सव कुठे अकरा दिवस तर कुठे नऊ दिवस अशा पद्धतीने साजरा होत आहे 
 
या सदरच्या सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमा मध्ये गैर कायद्याची मंडळी मिळून हुलडबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित ठाणे प्रमुखानी तात्काळ त्यांच्यावर एक्शन घ्यावे असे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे 

जिल्ह्यात सदरच्या परिस्थिती मध्ये चालू असलेल्या गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सार्वजनिक व धार्मिक सण मोठे असल्यामुळे सणांच्या अनुषंगाने कोणता ही अनुचित प्रकार घडणार नाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यांची अतिशय दक्षता घावी लागणार आहे 

अशा पद्धतीची दक्षता संबंधित ठाणे प्रमुखासह खेड्या पाड्यातील प्रतिष्ठित नागरिकासह पोलीस पाटलांनी व तंटामुक्त अध्यक्षांनी पत्रकारांनी या कडे जास्तीचे लक्ष द्यावे असे पोलीस अधीक्षक कुमार यांनी म्हटले आहे 

सदरचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे ही या नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी म्हटले आहे 

Post a Comment

0 Comments