नांदेड जिल्ह्याचे दमदार पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखाकडे लक्ष केंद्रित असल्यामुळे सदरच्या ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या काही भागात अधून मधून गुटखा बंदीची मोहीम चालूच असल्यामुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यात चांगलीच खळबळ उडाली आहे जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच काही दिवसात जिल्ह्यात गुटखा बंदीची मोहीम चालू केल्यामुळे अवैध गुटखा विक्रीला चांगलाच आळा बसल्याचे स्पष्ट चित्र शहरी भागासह ग्रामीण भागात दिसून येत आहे
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशा नुसार संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख व कर्मचारी अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर चांगलीच करडी नजर ठेवल्यामुळे शहरातून खेड्या पाड्यात येणाऱ्या गुटखा ९० ते ९५ टक्के बंदच झाला आहे
तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या कार्यकाळात सर्रास पणे नांदेड जिल्ह्यात शहरी भागातून ग्रामीण भागातील दुकानावर जोरदार विक्री होत होती परंतु जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधिकारी म्हणून रुजू झालेले अबिनाश कुमार यांनी सदरची मोहीम हाती घेतली असल्यामुळे गुटखा बंदीला चांगलाच आळा बसला आहे

0 Comments