Header Ads Widget

आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून रुई बु येथे दलित वस्तीतील समस्या बाबासाहेब हंबर्डे यांनी घेतल्या जाणून !!

         माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून रुई बु येथे दलित वस्तीतील नागरिकांच्या विविध समस्या भारतीय जनता पार्टीचे बाबासाहेब हंबर्डे हुस्सेकर यांनी दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी समस्या जाणून घेतल्या आहेत 
८९ विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांनी तालुक्यातील गावांतर्गत असलेल्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी भाजपातील पद अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आणि सदरचे कार्यकर्ते गावा गावात जाणून गावातील समस्या जाणून घेतल्या जात आहेत 

तालुक्यातील रुई बु येथील सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्यासह बाबासाहेब हांबर्डे हुस्सेकर दत्ता पाटील ढगे यांनी दलित वस्तीत येऊन बैठक आयोजित केली होती या बैठकीत विविध समस्यावर चर्चा करण्यात आली आहे 

सदरच्या बैठकीला दलित वस्ती मधील गोपाळराव पवार भीमराव वाघमारे, सताजी पवार गणपत पवार हणमंत वाघमारे राहुल वाघमारे केशव पवार बाबू वाघमारे दिंगाबर पवार मरीबा पवार राजू पवार सोपान वाघमारे माधव गणपती पवार अविनाश गणपती पवार भास्कर पवार आदी यावेळी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments