Header Ads Widget

स्व.खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधना नंतर त्यांच्यासाठी आलेला जन अश्रू जन समुदाय !!

         माधव पवार 
नांदेड लोक सभा मतदार संघांचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे हैद्राबाद येथे निधन झाल्याची वार्ता कळतात असंख्य लोकासह महिला मंडळाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले आणि दिवंगत खासदार यांचे निधन म्हणजे लाखो जनाला धक्का देणारे ठरले आहे 

जिल्ह्यातील नायागांव बाजार येथील भूमी पुत्र असलेले दिवंगत खासदार हे नायागांव विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व करीत असताना अनेकाच्या सुखा दु :खात सामील होऊन जन सामान्य माणसाच्या काळजातील नेता म्हणजे खासदार वसंतराव चव्हाण साहेब हे होते 

एक शांत संयमी मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव पाटील चव्हाण होते - बालाजी बच्चेवार 

आदरणीय खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण व मी कट्टर राजकीय विरोधक असून सुद्धा सन्मान व पाहुणचार करण्यामध्ये ते कुठेच कमी पडत नव्हते शांत संयमी मोठ्या  मनाचं व्यक्तिमत्व वसंतरावजी चव्हाण यांच्या अकस्मित जाण्याने नायगाव परिसराच नव्हे तर  ----

नांदेड जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे त्यांच्या जाण्याने राजकीय सामाजिक शैक्षणिक पोकळी निर्माण झाली आहे एक सरपंच ,जिल्हा परिषद सदस्य ,आमदार , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन ते,खासदार अशी ५० वर्ष त्यांनी या भागाची सेवा केली आहे 

त्यांचे आकस्मित जाणे वेदनादायी व मन सुन्न करणारे आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही  ईश्वरचरणी प्रार्थना  शोकाकुल  बालाजी बच्चेवार !!

स्व.खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधना नंतर त्यांच्यासाठी आलेला जन अश्रू जन समुदाय दर्शन घेण्यासाठी उपस्थित झाला आहे 

Post a Comment

0 Comments