पंतप्रधान पिक विमा योजना ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाचा पिक विमा भरतात परंतु गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते
पिक विमा कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्याला पिक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्या मध्ये जमा केली असली तरी उर्वरित शेतकऱ्यांचं काय असा प्रश्न शेतकऱ्याना भेडसावत आहे
१५ ते २० दिवसां पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये पिक विमा कंपनीने पीक विम्याची रक्कम जमा केली ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्याने पिक विमा कंपनीला तक्रार करण्यासाठी कंपनीने सांगितले होते
परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम पडली नसल्यामुळे वारे विमा कंपनीच्या ढिसाळ कारभार झाला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये पीक विम्याची रक्कम जमा करून डोळे पुसले असले तरी अजून असंख्य शेतकरी विम्या पासून वंचित असल्याचे दिसून येत आहे
शेतकऱ्यांनी विमा कंपनीला केलेल्या तक्रारी वरून दिसून आले असून जर सदरच्या शेतकऱ्यांना पिक विमा येत्या आठ दिवसात नाही मिळाल्यास शेतकऱ्यांना रुद्र अवतार घ्यावा लागेल असा शेतकऱ्यातून सवाल केला जात आहे

0 Comments