Header Ads Widget

नांदेड जिल्हाचे लाडके खासदार विद्यमान वसंतराव चव्हाण साहेबाना लाखो बहिणीसह जनतेच्या शुभेच्छा - भाऊ लवकर टवटवीत होऊन या -

        माधव पवार 
नांदेड लोकसभा मतदार संघांचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण साहेबाना लाखो बहिणीसह जनतेच्या राखी पौर्णिमेच्या शुभ दिनी साहेबाना शुभेच्छा देऊन भाऊ लवकर टवटवीत होऊन जनतेच्या सेवेसाठी या अशी अपेक्षा लाडक्या बहिणीसह जनतेने व्यक्ती केली आहे 
जिल्हाचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण यांना हैद्राबाद येथील दवाखान्यात उपचार चालू असल्यामुळे जिल्ह्यातील लोकांची मोठया प्रमाणात चिंता वाढली होती परंतु साहेबाची तब्येत चांगल्या प्रकारे असल्यामुळे जनतेत समाधानाचे वातावरण पसरले आहे 

आज राखी पौर्णिमा असल्यामुळे या रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांना लाडक्या बहिणीसह कोठी कोठी जनते कडून शुभेच्छा देण्यात येत आहे 

दर वर्षी ऑगस्ट महिन्यात येणारा सण हा बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस असल्यामुळे खासदार वसंतराव चव्हाण साहेबाना या राखी पौर्णिमेच्या सणाच्या निमित्ताने लाडक्या बहिणी कडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत 

श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्म शास्त्रात म्हणले आहे. या विधीस 'पवित्रारोपण' असे ही म्हणतात भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही या मागची मंगल मनोकामना असते म्हणून माझ्या भावाची तब्येत अतिशय चांगली व्हावी या हेतूने परमेश्वरा कडे पार्थना ही करण्यात येत आहेत 


Post a Comment

0 Comments