Header Ads Widget

राखी पौर्णिमेच्या दिवसीच लाडक्या बहीण पैसे उचलण्यासाठी बँकेच्या दारात ताटकाळात उभ्या !!

        माधव पवार 
राज्यात राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मोठया जोमात अमलात आणली आणि लाडक्या बहीण्याच्या बँक खात्यात ३००० हजार रुपये जमा झाले आहेत 

सदरचे पैसे उचलण्यासाठी ऐन राखी पौर्णिमेच्या दिवसीच महिला वर्गाना बँकेच्या दरबारात दिवस भर ताटकळत उभे राहावे लागले असल्याचे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कृष्णुर येथे दिसून आले आहे 

मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना थोडक्यात महिला वर्गाना दिलासा देणारी ठरली असली तरी सरकारने सदरच्या लाडक्या बहिणीला केवायसी व आधार लिंक करण्यासाठी अट्ट घातली असल्यामुळे छोटे छोटे लेकर सोबत घेऊन बँकेच्या दारात ताटकाळत असल्याचे चित्र दिसून आले आहे 

राखी पौर्णिमेच्या दिवसीच लाडक्या बहीण पैसे उचलण्यासाठी बँकेच्या दारात ताटकाळात उभ्या राहिल्या आहेत जर सरकारने केवायसीची आट्ट रद्द करायला हवी होती 

परंतु तसे करत नाही सरकारने पात्र लाडक्या बहिणीच्या खात्याला यादी प्रमाणे आधार लिंक व केवायसी करण्याची गरज भासत असली तरी सदरच्या महिलांना केवायसी फॉर्म भरून दयावे लागत असले तरी दिवसभर बँकेच्या समोर उभे राहावे लागत आहे 


Post a Comment

0 Comments