Header Ads Widget

काँग्रेस पक्षाकडून विकास पाटील देवसरकर इच्छूक

      नागोराव शिंदे 
हिमायतनगर  हदगाव हिमायतनगरआगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून हदगाव हिमायतनगर तदारसंघाकरिता नवीन उमेदवाराचा शोध सुरु असल्याच्या चर्चा सुरु असतानाच हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली असून, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातून प्रबळ दावेदार मानले जात आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हदगाव मतदारसंघातून इच्छुकांची चाचपणी सुरू केलेली आहे. यामध्ये हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांचे नावे प्रामुख्याने घेतले जात आहे. युवक काँग्रेस पासून पक्षाशी जोडले गेलेले देवसरकर यांनी पक्षात आत्तापर्यंत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत, त्यांच्या तालुका अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात दोन वेळा विधानसभा, हिमायतनगर नगरपंचायत, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समि ती, खरेदी-विक्री संघ आदीवर  वर्चस्व राखता आल्याने देवसरकर यांना संधी दिल्यास आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला नक्कीच विजयाची संधी राहील असे बोलल्या जात आहे. इच्छुक म्हणून अर्ज देताना नांदेड कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, हदगाव काँग्रेस कमिटी चे माजी अध्यक्ष बाबुराव पाथरडकर, शिक्षक सेल चे श्यामराव पाटील मनाठकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments