Header Ads Widget

कोपरा बु येथील एकनाथ लाठे यांची पोलीस उपनिरीक्षक पदि निवडीचे जंगी स्वागत

       नागोराव शिंदे 
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर 

हिमायतनगर उमरखेड तालुक्यातील तालुक्यातील कोपरा बु येथील विद्यार्थ्यांची शासकीय सेवा करण्यासाठी स्पर्धा लागली होती कोपरा बु तालुका 
उमरखेड येथील स्व तुकाराम लाटे यांचे नातू नागोराव शिंदे पळसपुरकर यांचा भाचा एकनाथ लाटे यांची पोलीस उपनिरीक्षक पदि निवडीबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला आहे कोपरा बु येथील अल्पभूधारक शेतकरी अर्जुन तुकाराम लांठे यांना तिनं मुलि दोन मुल असुन त्यांच्या मोठा मुलगा समाधान लाठे हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत चालवत फर्निचरची कामं करत करत त्यांनी आपला लाहण भाऊ एकनाथ लाठे यांच्या शिक्षणावर भर देउण आपला भाऊ मोठ्या पदावर जाणार यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे

एकनाथ लाठे यांची पोलीस उपनिरीक्षक पदि निवड झाल्याने त्यांच्या कुबांसह कोपरा बु येथील ग्रामस्थांनी एकनाथ लाठे यांचा बँड बाजा केशव लावून गावातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढून मोठ्या थाटामाटात जल्लोष साजरा करण्यात आला आहे 

यावेळी कोपरा नगरीचे पोलीस पाटील सुनील देवसरकर माजी सरपंच धनंजय माने पंजाबराव पाटील देवसरकर दादारावजी वानखेडे यांच्यासह पळसपुर नगरीचे प्रथम नागरिक सरपंच राजू पाटील वानखेडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकनाथ लाटे यांचे स्वागत करण्यात आले आहे

यावेळी गावातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढून हनुमान मंदिराच्या समोर स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला हर हर पण करून दर्शन घेऊन एकनाथ लाटे यांनी गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे 

एकनाथ लाठे यांच्या या निवडीचे महाराष्ट्र राज्य मराठा कुणबी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर राजेंद्र एस वानखेडे हिमायतनगर कर यांच्यासह हिमायतनगर तालुका कार्याध्यक्ष नागोराव शिंदे पळसुरकर यांनी सुद्धा एकनाथ लाटे यांचे स्वागत केले आहे 

एकनाथ लाटे हे नागोराव संभाजी शिंदे  यांचा भाचा आहे  त्यांच्या या निवडीमुळे संबंध लाटे शिंदे कडबाने वानखेडे रावते परिवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Post a Comment

0 Comments