Header Ads Widget

सरकारचे ढिसाळ नियोजन ऑनलाईन तक्रारी करून दीड महिना झाला तरी केवायसी झाली नसलेल्या शेतकऱ्याच्या नातेवाईकाच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होईना !!

       माधव पवार 
सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या वर्षी अतिवृष्टीने
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि सरकारने सदरच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केल्याच्या नंतर सदरच्या शेतकऱ्यांना अनुदान ही मंजूर झाले अचानक पणे सरकारने शेतकऱ्यांना केवायसी करण्यास सांगितले आहे 

सदरच्या सरकारने केवायसी करण्यासाठी आट घातली परंतु असंख्य शेतकऱ्यांच्या हाताच्या बोटाचे ठसे आले नसल्यामुळे सदरची केवायसी राहून गेली असल्यामुळे सदरच्या शेतकऱ्यांना अध्याप तरी अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे 

गेल्या महिन्या मध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे येत नसल्याने व केवायसी होत नसल्याची तक्रार ऑनलाइन तक्रार करण्यास सांगितले परंतु शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी ऑनलाईन तक्रार करून सुद्धा दीड महिला लोटला तरी शेतकऱ्यांच्या नातेवाईकाच्या खात्यामध्ये सदरच्या अनुदानाची रक्कम अध्याप जमा झाली नसल्यामुळे सदरच्या अनुदानाची रक्कम तात्काळ जमा करावी अशी मागणी केली जात आहे 

सरकारच्या दरबारात आंधळ दळतय कुत्र पीठ खातोय की काय अशी गत निर्माण झाली आहे

सरकारचे ढिसाळ नियोजन ऑनलाईन तक्रारी करून दीड महिना झाला तरी  केवायसी झाली नसलेल्या शेतकऱ्याच्या नातेवाईकाच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होत नसल्यामुळे स्वतंत्र दिनाच्या पूर्वी जमा करावी असे शेतकऱ्यातुन बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments