नायागांव तालुक्यातील मौजे पाटोदा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने बोलताना भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी बोलताना म्हणाले की बंधुनो घरा घरात आण्णाभाऊ घडवा देशात क्रांती झाल्या शिवाय राहत नाही असे मा.शिवराज पाटील म्हणाले आहे तालुक्यातील मौजे पाटोदा येथील कार्यक्रमात बोलताना माजी शिक्षण सभापती म्हणाले की विध्यार्थीना शाळेत पाठवून दिले पाहिजे व विध्यार्थीच्या शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे पुढे बोलताना पाटील म्हणाले की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ यांची जयंती साजरी करीत असताना सर्व समाज एकत्र आला पाहिजे असे यावेळी मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी म्हणाले आहे पाटोदा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष मनोहर डूमणे, राजेंद्र रेड्डी टाकळीकर, प्रल्हाद जेट्टेवाड, चक्रधर देशमुख पो पाटील कामाजी वाघमारे गंगाधर कोत्तेवार पत्रकार गंगाधर ढवळे आदी यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
बंधुनो घरा घरात आण्णाभाऊ घडावा देशात क्रांती झाल्या शिवाय राहत नाही - माजी शिक्षण सभापती शिवराज होटाळकर यांनी प्रतिपादन केले आहे

0 Comments