राजकीय वर्तुळात खळबळ उडून देणारे भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी जन आशीर्वाद दौऱ्याच्या माध्यमातून दिनांक २१ जुलै २०२४ पासून कोलंबी मठ संस्थानातील महाराजांचे आशीर्वाद घेऊन सदरच्या दोऱ्याला प्रारंभ केला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाच्या संदर्भात व मतदाराच्या भेटीघाटी घेण्यासाठी सदरच्या जन आशीर्वाद दौऱ्यांचे आयोजन व नियोजन करण्यात आले आहे तालुक्यातील कोलंबी मठ संस्थानाचे महाराज यांचे आशीर्वाद घेऊन दौऱ्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह नायगाव विधानसभा मतदार संघातील असंख्य भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठपणे काम करणारे माजी शिक्षण सभापती मा.शिवराज पाटील होटाळाकर यांनी नायगाव विधानसभा मतदार संघातील खेड्यापाड्यात जन आशीर्वाद दौऱ्याच्या माध्यमातून जनतेच्या व मतदाराच्या समस्या जाणून घेणार आहेत
भाजपाचे मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे आमचा नेता पावर फुल त्यांचा जन आशीर्वाद दौरा पावर फूल होत असल्याचे स्पष्ट त्यांच्या कार्यकर्त्यातून बोलून दाखविले आहे

0 Comments