Header Ads Widget

गावच्या विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकाच्या तात्काळ बदल्या करून नूतन ग्रामसेवकाची नेमणूक करा -

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील अनेक गावा मध्ये विकासाची वाट लागली असून ज्या ज्या गावात ग्रामसेवक नावालाच आहेत दहा दिवसाला १५ दिवसाला येऊन ग्रामपंचायत कार्यालयात येऊन फक्त १ तास बसून जातात परंतु गावाच्या विकासासाठी कधी चर्चा करीत नाहीत अशा ग्रामसेवकाची तात्काळ बदली करण्यात यावी मागणी होत आहे 

अशा गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याऱ्या काही ग्रामसेवकाच्या तात्काळ बदल्या करून नूतन ग्रामसेवकाच्या नेमणूकी करण्यात यावेत मागणी होताना दिसत आहे 

खेड्यापाड्यातील गावात नुसता नामदारी ग्रामसेवकाची आवश्यकता नसून गावाचा विकास करणारा ग्राम सेवकाची आवश्यकता असून अशा प्रकारे गावच्या विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकामुळे अनेक गावात नाल्या तुबंल्या आहेत रस्त्यावर चिखल अशा प्रकारच्या समस्यानी गाव विकासा पासून दूर राहत आहे 

तालुक्यातील बऱ्याच पैकी गावात हर घर नळ योजनाच्या नावाखाली सिमेंट रस्ते फोडून ठेवल्यामुळे चिलमय रस्ते झाले असताना ज्या गावात सेवक कार्यरत आहेत यांचे या चिखमय रस्त्या कडे बघत सुद्धा नाहीत मुरूमची व्यवस्था करून चिखल मुक्त करीत नाहीत अशा ग्रामसेवकाच्या तात्काळ बदल्या करून नूतन ग्रामसेवकाची नेमणूक करण्यात यावेत 

गावच्या विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकाच्या तात्काळ बदल्या करून नूतन ग्रामसेवकाची नेमणूक करा अशी मागणी होत आहे 

Post a Comment

0 Comments