माधव पवार नायगाव तालुक्यातील रुई बु व रुई परिसरातील जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येत असलेले कामे मोठया प्रमाणात खोंळबली असल्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर गावा अंतर्गतचे सिमेंट रस्ते फोडून ठेवल्यामुळे रुई बुच्या दलित वस्तीत पावसामुळे चिखलच चिखल झाला असल्याने नागरिकांना जाण्या व येण्यासाठी व मोटार सायकल धारकांना नाहक त्रास होत आहे
नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे गुत्तेदाराने सदरचे काम करण्या ऐवजी बंद केले असल्यामुळे चिखलमय रस्ते बनले आहेत व जागोजागी पाणी पावसाचे साचल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकरता येत नाही त्यासाठी सदरचे काम तात्काळ चालू करावेत किंवा खोदलेल्या रस्त्या दुरुस्त करावेत
हर घर नल योजनेचे उद्दिष्ट देशातील प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावेत म्हणून सन २०२४ पर्यंत या योजनेद्वारे प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची जोडणी उपलब्ध करून दिली जाणार असे शासनाचे धोरण असताना सुद्धा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची गुत्तेदारावर वचक नसल्यामुळे सदरचे काम खोंळबले आहे
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या ढिसाळ नियोजनामुळे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम गुत्तेदारा कडून रखडले दलित वस्ती झाली चिखलमय झाले आहेत
0 Comments