नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघात विधानसभेचेच्या निवडणुकी पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रंगीत तालीम चालू करण्यात आली असल्यामुळे या तालमेत भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी दिनांक २१ जुलै २०२४ पासून या नायागांव विधानसभा मतदार संघात जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघ जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत करणारे मतदार संघ असल्यामुळे या मतदार संघात भाजपाचे शिवराज पाटील हे अतिशय महत्वाची संकल्पना सुचवून जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले यात्रे शेकडो भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करण्यात येत असलेली रंगीत तालीम ही कमळाचा रंग फुलविणारी ठरणार आहे
तालुक्यातील कोलंबी मठ संस्थानाचे महाराज यांचे आशीर्वाद घेऊन दौऱ्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह नायगाव विधानसभा मतदार संघातील असंख्य भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठपणे काम करणारे माजी शिक्षण सभापती मा.शिवराज पाटील होटाळाकर यांनी नायगाव विधानसभा मतदार संघातील खेड्यापाड्यात जन आशीर्वाद दौऱ्याच्या माध्यमातून जनतेच्या व मतदाराच्या समस्या जाणून घेणार आहेत

0 Comments