नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई मार्गे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य राज्य परिवहन मंडळाची बस बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी हेळसांड होत असल्याने या भागातील जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे
अशा बाबीकडे लोकप्रतिनिधीचे व राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे ह्या मार्गावर बस गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे
जिल्ह्यातील नायगाव तालुका हा सर्वात पॉप्युलर व मोठा असल्याने येथे बाजार हाट करण्यासाठी व इतर महत्त्वाच्या कामासाठी बाहेर तालुक्यातून लोक नायगाव येथे येत असतात आणि ह्या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असताना सुद्धा राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्याने बस सेवा चालू करत नसल्याने कमालीचे नागरिक हैराण होताना दिसून येत आहे
नायगाव तालुक्यातील रुई बु. घुंगराळा बळेगाव हा मार्ग एकंदरीत चार ते पाच तालुक्याला जोडला असताना सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून ह्या मार्गावरील बस सेवा लोकप्रतिनिधीच्या व राज्य परिवहन मंडळाच्या बेजबाबदार पणामुळे बंद असल्याने ती बस सेवा सुरळीत करण्यासाठी या भागातील पुढारी लक्ष देतील का असा सवाल जनतेने व्यक्त केला आहे

0 Comments