नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर काल परवाच एक व्हिडिओ तुफानी व्हायरल करण्यात आला आहे
सदरचा व्हिडिओ हा तुफानी व्हायरल झाल्याच्या नंतर त्या व्हिडिओ मध्ये विद्यमान आमदारांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये सदरचा रखडलेला पिक विमा दिनांक २९ जुलै २०२४ पासून म्हणजे सोमवार पासून जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगितले आहे
"आमदार " साहेब " सदरचा पीक विमा जमा होण्या ऐवजी गेला कुणी कडे असा सवाल ग्रामीण भागातून केला जात आहे
गेल्या वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते विमा कंपनी कडून पंचनामे हे सुद्धा करण्यात आले होते सदरच्या शेतकऱ्यांना विमा मंजूर झाल्याच्या नंतर सुद्धा विमा कंपनीने तुटपुंजी मदत सुद्धा दिली होती
त्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये पीक विमा जमा उर्वरित जमा करण्यात आला नव्हता परंतु नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिनांक २९ जुलै २०२४ पासून शेतकऱ्याच्या बँक विमा जमा होणार असल्याचे सांगितले आहे
सदरच्या शेकडो शेतकरी आपल्या मोबाईलवर विम्याच्या रक्कमेचा एसमेस आला का ? म्हणून दिवसभर पाहत राहिले परंतु विमा काय जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्याची कुठे तरी दिशाभूल होते की काय ? असा सवाल ही शेतकरी करताना ऐकावयास मिळत आहे

0 Comments