Header Ads Widget

रान डुक्कराच्या हल्ल्यात तरुण शेतकरी गंभीर जखमी गजानन चव्हाण जखमीना भेट वनपरीक्षेत्र अधिकारी देगलूर बिलोली यांनी तात्काळ मदत द्यावी !!

                  माधव पवार 
नायगाव तालुकातील मौजे गोळेगाव शिवारात एका तरुण शेतकऱ्यावर अचानक रान डुक्कराने हल्ला चढवीला असल्यामुळे सदरचा शेतकरी गंभीर जखमी झाला असल्याने दवाखान्यात त्यांच्या उपचार चालू करण्यात आले यावेळी जखमीची गजानन पाटील चव्हाण यांनी घेतली आहे 

सध्याच्या परिस्थित सर्व शेतकरी राजा शेता मध्ये पेरणी करत आहेत अचानक पने रान डुक्कराचा कळप समोरून धावत असताना रानडुक्कराने सदरच्या शेतकऱ्यावर हल्ला केला असून या शेतकऱ्या वरती प्राण घातक हल्ला झाला आहे 

गोळेगाव येथील तरुण शेतकरी जब्बर जखमी झाला असल्यामुळे त्या शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत नायगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण  यांनी डॉ. मधुसूदन दिग्रसकर यांची ही भेट घेतली आहे 

वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर बिलोली यांनी तात्काळ या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन गोळेगावच्या व यापूर्वी घडलेल्या घटनेतील शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान उपलब्ध करून द्यावेत कारण अशा घटना अनेक वेळा नायगाव तालुक्यात घडल्या असताना सुद्धा वन विभागा कडून त्यांची जास्तीची दखल घेतल्या जात नाही असे अनेकदा निदर्शनास आले आहे 

वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर यांना गजानन पाटील चव्हाण यांची विनंती आहे की तात्काळ सदरच्या शेतकऱ्यांना आपल्या स्तरावर मदत मिळवून द्यावे अशी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे


Post a Comment

0 Comments