Header Ads Widget

नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून जनसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी तेजदार लेखन करणाऱ्या पत्रकाराच्या वाढदिवसा निमित्त विशेष लेख !!

वाढदिवसा निमित्त विशेष लेख 
हिमायतनगर तालुक्याच्या पळसपुर नगरीचे भूमिपुत्र, आपल्या लेखणीच्या बळावर व जिद्दीच्या सामर्थ्याने जनसामान्यांच्या व्यथा, वेदना समस्या शासनासमोर परखड भाषेत मांडणारे व त्यांचा सतत पाठपुरावा करून न्याय मिळवून देणारे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून हिमायतनगर तालुक्यामध्ये पत्रकार नागोरावजी शिंदे यांची ओळख आहे. त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने हा विशेष लेख..

पत्रकारिता क्षेत्रांमध्ये त्यांनी दैनिक गोदातीर समाचार, दैनिक एकमत च्या माध्यमातून परखडपणे पत्रकारिता गाजवली. ती सध्या महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह (MPL NEWS ) चे जिल्हा प्रतिनिधी असून नायगाव फास्ट न्यूज चे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी आहेत. समाज हिताचा वसा घेऊन प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी अनेक समस्यांना तोंड देत "पत्रकारिता परमोधरम " हे सिद्ध केले आहे. हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयातील तसेच तालुक्यातील गावागावातील खडा न खडा माहिती असलेले तसेच प्रत्येक ठिकाणी जनसंपर्क ठेवून तेथील समस्या मार्गी लावण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.

तालुक्यातील गोरगरीब, वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नागोराव शिंदे हे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून करत आले आहेत. तालुक्यामध्ये अनेक विकास कामांच्या पूर्ततेसाठी त्यांनी प्रसंगी रास्ता रोको आंदोलन असो आमरण उपोषण असो की धरणे आंदोलन असो हे प्रत्येक हत्यार त्यांनी उपसले आहेत. तालुक्यातील प्रत्येक कार्यालयातील शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना खडे बोल सुनावत तसेच ते यातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवून त्या मार्गी लावण्याचा सतत प्रयत्न करत असतात.

नांदेड जिल्ह्याभर त्यांची चांगलीच  ओळख व दांडगा जनसंपर्क आहे. वेळोवेळी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न,रोजमजूरदार तसेच भूमिहीनांचे प्रश्न लावून धरले. तालुक्यात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी अनेकदा उपोषणाचेही हत्यार उपसले आहे. आपल्या सडेतोड लेखणीतून त्यांनी  विद्रोही बाणा पेरत प्रत्येक समस्यांचा त्यांनी पाठपुरावा केला आहे. यामुळे हिमायतनगर तालुक्यात त्यांचा पत्रकारिता क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे. पत्रकारिता क्षेत्रात नव्याने आलेल्या पत्रकारांना त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असते.

ज्येष्ठ पत्रकार नागोराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो व पत्रकार क्षेत्रातून त्यांना सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बळ मिळत राहो या सदिच्छा....

नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून जनसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी तेजदार लेखन करणाऱ्या पत्रकाराच्या वाढदिवसा निमित्त विशेष लेख  !!

Post a Comment

0 Comments