Header Ads Widget

कौठाळा गावच्या नागरिकांची बेहाल जिल्हा परिषद शाळे पासून ते गावा पर्यंत गुत्तेदाराच्या बेजबाबदार पणामुळे रस्ता झाला चिखलमय गावकऱ्यातून संताप !!

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कौठाळा हे गाव लोकसंख्येने छोटे असली तरी विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर प्रगतिशील असल्यामुळे या गावातच म्हणजे जिल्हा परिषद शाळे पासून ते थेट गावा पर्यंत गुत्तेदाराने केला नसल्यामुळे गावकऱ्यासह शाळेत जाणाऱ्या विध्यार्थीची बेहाल होत असल्यामुळे गावकऱ्यातुन संताप व्यक्त करण्यात येत आहे 

या भागातील राजकीय पुढारी सुद्धा अशा गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज असून सदरचे राजकीय पुढारी नको त्या कामाला धजावतात परंतु अशा गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्यामुळे अशा गुत्तेदारासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्या कडून अशा पद्धतीचे अर्धवट कामे सोडल्या जात असतात असे गावकऱ्याचे म्हणे आहे 

तालुक्यातील मौजे कोठाळा येथे नायगाव ते दुगाव रोडवर शाळे पासून मारोतराव पांढरे यांच्या घरा पर्यंत गुत्तेदाराने काम न केल्यामुळे  प्रवाशाचे बेहाल होत आहेत परंतु अनेक जन मोटार सायकल घेऊन जात असताना चिखलमय रस्त्यावर पडल्याचे सांगण्यात येते आहे 

कौठाळा गावची जिल्हा परिषद शाळा ही गाव बाहेर असल्यामुळे मुलांचे शाळेत येणे जाणे फार कठीण झाले असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी तात्काळ गुत्तेदाराशी संपर्क करून सदरचा झालेला चिखलमय रस्ता बनवून दयावेत अशी मागणी करण्यात येत आहे 

या मार्गावर अनेक मोटर सायकलन बरेच लोक पडलेले आहेत गावातील सुज्ञान नागरिकानी गुत्तेदाराला वेळोवेळी संपर्क करून सुद्धा त्यांच्या कडून प्रतिसाद मिळत नाही नागरिकानी सांगितले आहे 


Post a Comment

0 Comments