राज्यातील सरकारने माझी लाडकी बहीण ह्या योजनेची घोषणा केल्यामुळे व दर महिन्याला दीड हजार रुपये बँक खात्यात जमा होतील या अशे पोटी भर पेरणीच्या कार्यकाळात पुरुषासह महिलांनी सदरचे फॉर्म ऑनलाईन करण्यासाठी सेतू केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे
सरकारने काढलेल्या या योजनेमुळे सदरचे फॉर्म दाखल करण्यासाठी महिला व पुरुष मंडळी अगदी व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत असून सध्या शेतातील पेरण्या सदरच्या योजनेमुळे थोडक्यात खोळंबल्या आहेत
जवळच्या सेतू केंद्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत ऑनलाइन करण्यासाठी लोक बसून आहेत कधी नेट प्रॉब्लेम तर कधी कागद पत्राची पूर्तता करण्यासाठी बराच काही खर्च होताना दिसून येत आहे
सध्याच्या परिस्थिती मध्ये असलेल्या पेरण्या करण्याच्या संदर्भात महिला वर्ग व पुरुष मंडळी मिळत नाही अशी परिस्थिती सध्या तरी ग्रामीण भागात निर्माण झाली आहे

0 Comments