Header Ads Widget

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या हातातून भाजपाची सीट जावू नये म्हणून मा.शिवराज पाटील होटाळकर यांना उमेदवारी आवश्यक !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागत असल्याने महायुतीच्या वरिष्ठ नेते मंडळीं कडून भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना उमेदवारीची संधी मिळवून दिली तर योग्य दिशा मिळेल असा विश्वास या नायगाव मतदार संघातील जनतेने व्यक्त केला आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सदरच्या पक्षासाठी गेल्या अनेक वर्षा पासून प्रमाणिक 
 पणे व एकनिष्ठपणे पक्षाचे काम करीत असल्यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेते मंडळीनी सदरच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाची जर उमेदवारी दिली तर सदरचा मतदार संघ काबीज होवू शकतो असा अंदाज ही या मतदार संघातील जनतेतून व्यक्त केला जात आहे 

काल परवाच झालेल्या नांदेड लोकसभेच्या निवडणुकी मध्ये महायुतीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला असल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकी मध्ये नायगाव विधानसभा मतदार संघाची उमेदवारी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना महायुतीने दिली पाहिजे अशी मागणी शिवराज पाटील होटाळकर यांच्या कार्यकर्त्यातून होत आहे 

Post a Comment

0 Comments