नायागांव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सोमठाण्याच्या तरुणाची कृष्णूर व हिप्परगा शिवारात लिंबाच्या झाडाला लाल दस्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
सदरची घटना तीन ते चार दिवसाखाली असली तरी दिनांक १७ जून २०२४ रोजी उघडकीस आली असून सदरचे प्रेत सडलेल्या अवस्थेत असल्याने सर्वत्र दुर्गधी पसरली आहे
तालुक्यातील सोमठाणा येथील रहिवासी असलेले सदरचे तरुण हे सोमठाणा व कृष्णूर आणि हिप्परगा शिवारात येऊन लिंबाच्या झाडाला लाल दस्तीने गळफास घेतली असल्याने सदरची घटना कळताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि राम कृष्ण श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार खोले फौजदार सोनुले बिट जेमादार आर टी पवार पो का. घुमे बारळे इंगोले जीप चालक सदाशिव पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे
सोमठाणा येथील मयत तरुण रमेश नागोराव कदम वय २६ वर्ष यांनी दिंगाबर सूलतांजी कदम यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे
सदरच्या मयताची ओळख त्यांच्या नातेवाईकानी पटवून सदरची माहिती दिली व हा तरुण सोमठाण्याचा असल्याचे सांगिल्या वरून पोलीसानी पंचनामा केला व सदरचे प्रेत ताब्यात घेतले आहे

0 Comments