विश्वगुरु समतानायक क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्यावर आधारीत कै.महारुद्र उर्फ बाबुराव हात्ते यांच्या स्मरणार्थ व कवी गणेश महारुद्र हात्ते कौठेकर यांच्या संकल्पनेतून सदरची निर्मिती करण्यात आली आहे
त्यांच्या गीतातून , गायक स्वरशिरोमणी हावगी पन्नासे कौठेकर यांच्या सुमधुर आवाजात ग्रामदैवत भगवान श्री कोटेश्वर मंदिर बसव कौठा व क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची शरणभुमी बसवकल्याण येथे या नविन गीताची शुटींग संपन्न झाली आहे
या गीताचे निर्मिती सहायक श्री शिवलिंग हात्ते कौठेकर , संगीतकार श्री सुदर्शन भुरे सर , संगीत संयोजक उत्तम पन्नासे कौठेकर व छाया चित्रीकरण राहुल राठोड हे आहेत
सहभागी कलाकार म्हणून गायक हावगी पन्नासे,गणेश हात्ते, शिवलिंग हात्ते,बालाजी पावडे,उत्तम पन्नासे,सिध्देश्वर लाकडे,मारोती कामोले,उत्तमराव पन्नासे,गंगाराम हात्ते,संतोष देशमुख,रविशंकर
हात्ते,साहिल भाजिपाले,ओमराज गंभिरे,विरशैव महिला व पुरुष भजनी मंडळ कौठा यामध्ये सहभागी आहेत...
या नविन गीताच प्रसारन हावगी पन्नासे या युट्युब चॅनलवर लवकरच प्रसारीत होणार आहे

0 Comments