नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील रुई बु येथे व परिसरात जिईओची रेंज झिरो तर एरटेलचे टॉवर मोठया थाटाने बसविण्यात असले असले तरी ते टॉवर शोभेची वस्तू बनले असल्यामुळे ग्राहक कमालीचे वैतागून गेले असल्यामुळे सदरच्या टॉवर धारकांनी तात्काळ रेंज सोडून मोबाईल धारकाची होणारी गैरसोय टाळावी असे मोबाईल धारकांतून मागणी व बोलल्या जात आहे
तालुक्यातील रुई बु व रुई परिसरात कोणत्या ही टॉवरची रेंज परिपूर्ण मोबाईल धारकांना मिळत नसल्यामुळे ग्राहक रिचार्ज करून विनाकारण पैसे घालत असल्यामुळे सदरील टॉवर धारका कडून ग्राहकाची आर्थिक लूट या कंपन्या करत असल्याने त्यांच्यावर कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे
रुई बु येथे एअरटेल चे टॉवर बसविण्यात आले परंतु त्या टावर च्या माध्यमातून ग्राहकांना रेंज मिळत नसल्याने व त्याच बरोबर आयडिया टॉवरला व जिओची रेंज झिरो असल्याने ग्राहकांना मोबाईल लावण्यासाठी उंच ठिकाणी जाऊन नातेवाईकांना बोलावे लागते तर बरोबर ऐकू येत नाही दुसऱ्याचा फोन येत नाही आणि फोन लावल्यास फोन लागत नाही अशी अवस्था रुई बु.येथील टावरची झाली आहे

0 Comments