Header Ads Widget

राज्य सरकारने केवायसीच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्याचे अनुदान रोखले

          माधव पवार
राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्याच्या बँक खात्यात केवायसीच्या नावाखाली नुकसान भरपाईची रक्कम बऱ्याच पैकी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आली नसल्यामुळे सदरच्या शेतकऱ्यातुन संताप व्यक्त केला आहे

गोरगरीब शेतकऱ्याचा अंगठा येत नसल्यामुळे केवायसी होत नाही यावर शासन काही पर्याय काढत नसल्याने सदरची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

राज्यातल्या दळभद्री सरकारने अनेक शेतकऱ्यासाठी योजनेच्या घोषणा केल्या असल्यामुळे तरी शेतकऱ्या पर्यत आज " तक " पोहचल्या नाहीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यासाठी २००० हाजार रुपये प्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचे सांगितले आहे

परंतु अध्याप तरी अनेक शेतकऱ्याच्या बँक खात्यात केवायसीच्या नावाखाली सदरची जमा करण्यात नसल्याने अनेक शेतकरी वंचित आहेत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजने प्रमाणे दोन हजार रुपये जमा करण्याचे घोषित केले होते

परंतु ज्या शेतकऱ्यांनी अंगठ्या अभावी केवायसी केली नाही अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात सदरची रक्कम जमा होत नसल्यामुळे सदरची केवायसीची आट्ट रद्द करून गोरगरीब शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासकीय अनुदानासह पंतप्रधान सन्मान योजना सह मुख्यमंत्रीच्या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे अशी शेतकऱ्यांचे म्हणे आहे 



Post a Comment

0 Comments