Header Ads Widget

वन विभागाचे सेवा निवृत्त कर्मचारी तथा जेष्ठ नागरिक पांडुरंग टोकलवाड यांचे निधन


नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क

नांदेड शहरातील दिलीप सिंघ कॉलनी परिसरातील रहिवासी व वन विभागाचे निवृत्त कर्मचारी तथा जेष्ठ नागरिक पांडुरंग टोकलवाड यांचे दीर्घ आजाराने दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी सांयकाळी निधन झाले ते ८३ वर्षांचे होते त्यांनी वन विभागात प्रामाणिक पणे सेवा केली आहे

बाबा मला तुझी आठवण रोज येते, मी स्वत:शी झगडताना मला मदत करणारा कोणी ही नाही मायाळू, प्रेमळ नसलात तरी कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही असे त्याचे मुलं म्हणत आहे

आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड घडविणारा ठरो, हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या जिवंत शब्दांची
श्रद्धांजली ठरो 

सेवा निवृत्त कर्मचारी तथा जेष्ठ नागरिक पांडुरंग टोकलवाड त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुले सुना, २ मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे

त्यांच्या पार्थिवावर दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता गोवर्धनघाट नांदेड येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत बजरंग गजानन व तुळशीराम टोकलवाड यांचे ते वडिल होत त्यांच्या निधना बद्दल विविध क्षेत्रातुन दु:ख व्यक्त होत आहे

Post a Comment

0 Comments