माधव पवार
तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सभा घेऊन येथील राजकीय नेते मंडळीना सरकारला चॅलेंज केले होते की आम्ही आमच्या राज्या मध्ये गोरगरीब जनतेला कशा पद्धतीने योजना देतो तशा पद्धतीने महाराष्ट्रात का देत नाही असा सवाल करीत मोठ मोठाल्या वेगवेगळ्या ठिकाणी भव्य सभा घेतल्या आहेत
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी आर यांच्या उपस्थिती मध्ये नांदेड जिल्ह्यातील काही दिग्गज नेते मंडळीनी त्यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला होता महाराष्ट्रामध्ये के सी आर चा पक्ष पाठवला असल्यामुळे येथील राजकीय मंडळीं सुद्धा विचारात पडली असल्याचे चित्र दिसून आले होते
के सी आर पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील नामांकित पक्षाला राम राम करून एका तिथेच नेत्यांची शेकडो कार्यकर्त्याला घेऊन जाहीर प्रवेश केला होता परंतु सदस्य परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे सुटले असताना सुद्धा पक्षाची व नेत्याची कुठे ही चर्चात्मक चर्चा नसल्यामुळे सदरचा पक्ष हा महाराष्ट्रात येऊन केवळ देखावा दाखविला आहे
नांदेड लोकसभेच्या निवडणुकी मध्ये तेलंगणाची माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपला उमेदवार देणार का ? हे भविष्यात पाहावे लागणार आहे

0 Comments