वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची गावा गावात चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
लोकसभेच्या निवडणूक काही दिवसात लागणार असल्यामुळे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहेत
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे लाखोच्या संख्येने सकल मराठा समाज असल्यामुळे मराठा योद्धा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तर योग्यच होईल अशी सुद्धा चर्चा चालू आहे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा असलेला पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हे सर्व धर्मातील लोकाला घेऊन चालणारी असल्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये राज्यातील नक्कीच राजकीय उलथा पालट होईल अशी चर्चा ग्रामीण भागात चालू आहे
राज्यातले राज्य सरकार सकल मराठा समाजाची मराठा आरक्षणाच्या संदर्भा मध्ये दिशाभूल करत असल्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी दर्शविली तर लाखो सकल मराठा समाज खंबीर पणे पाठी मागे राहिल असा विश्वास जनतेतून दिला जात आहे

0 Comments