नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९१६ अधिकारी व कर्मचारी यांना प्रथम प्रशिक्षण दिले जाणारा असून सदरचे प्रशिक्षण दिनांक २९ मार्च २०२४ पासून सकाळी ९ ते १ तर दुपारी २ ते ६ वाजण्याच्या दरम्यान सदरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे
सदरचे प्रशिक्षण होणार असल्याची माहिती नायगावच्या कर्तव्य महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी दिली आहे
पहिल्या सत्रात मतदान केंद्र अध्यक्ष पी आरओ सहाय्यक मतदान केंद्र अध्यक्ष पी ओ एल असे एकूण ८६९ अधिकाऱ्याना प्रशिक्षण दिले जाणार असून सकाळ सत्रात पहिले दोन तास सकाळी ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान ४५० अधिकाऱ्याना पी पी टी प्रेसेंटेशन द्वारे निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रा वरील कर्तव्य विविध फॉर्म यावर माहिती देण्यात येणार आहे नांदेड जिल्ह्यचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार नायगावच्या महिला तहसीलदार डॉ. धम्म प्रियाताई गायकवाड यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली असून सदरच्या निवडणुकी पूर्वी १८१६ अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी दिनांक २९ मार्च २०२४ पासून सदरचे प्रशिक्षण चालू होणार आहे याच सत्रात सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान स्वतंत्र रूम मध्ये उर्वरित ४१९ अधिकारी यांना दोन तासात ई व्ही एम व्ही व्ही पी ए टी क्लास रूम हॅन्ड ऑन प्रित्याशिक प्रशिक्षण देण्यात येणार आहेसकाळच्या सत्रात पुढील सकाळी ११ ते दुपारी एक वेळेच्या दरम्यान वरील ४१९ अधिकाऱ्यांना पी पी टी द्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती नायगावच्या कर्तव्य दक्ष महिला तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे
सार्वत्रिक लोकसभा २०२४ च्या अनुषंगाने प्रथम १९१६ अधिकारी व कर्मचारी घेणार प्रशिक्षण - नायगावच्या महिला तसीलदार डॉ धम्म प्रियाताई गायकवाड यांची माहिती दिली असून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १ हाजार नऊशे १६ अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे

0 Comments