Header Ads Widget

बरबड्याचे माजी सरपंच बालाजीराव मदेवाड यांनी असंख्य काँग्रेस कार्यकर्त्याच्या समवेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात केला प्रवेश -

                 माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करून भाजपा पक्षात प्रवेश केला असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते हळूहळू भाजपात प्रवेश करत असल्याने एक कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

बरबड्याचे माजी सरपंच तथा तत्कालीन काँग्रेस पक्षाचे एक धडाकेबाज तोफ असलेले बालाजीराव मदेवाड यांनी असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या समवेत भाजपा पक्षात प्रवेश केला आहे

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच काँग्रेस पक्षाला दगा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्याने चर्चेला मोठे उदान आले होते

त्या पाठोपाठ खासदार अशोकराव चव्हाण यांचे कार्यकर्ते आता थेट काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजपाच्या घरट्यात प्रवेश करत असल्याचे दिसत आहे

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अगदी लोकसभा निवडणूक डोळ्या समोर असताना काँग्रेस पक्षाची फळी कमजोर करण्यासाठी थेट भाजपा पक्षात प्रवेश केला असल्याचे सदरच्या जनतेतून बोलल्या जात असली तरी नायगाव तालुक्यातील बरबडा येथील एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे माजी सरपंच बालाजीराव मद्देवाड यांच्या समोर एक प्रकारचा फार मोठा असा पेच निर्माण झाला होता

ते म्हणजे एका बाजूने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणयांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे बालाजीराव मदेवाड तर दुसऱ्या बाजूने नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा सुद्धा अतिशय निकटचा निष्ठावंत कार्यकर्ता आहेत 

माजी सरपंच बालाजीराव मद्देवाड यांना पक्ष बदली करण्यासाठी मागे आड पुढे विहीर अशी परिस्थिती झाली असताना सुद्धा नायगावकराला सोड चिट्टी देऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा पक्षात प्रवेश केला असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलेले आहेत 

Post a Comment

0 Comments