Header Ads Widget

मुख्यमंत्र्याच्या आमदाराची गाडी आज्ञात आंदोलकांनी फोडली सकल मराठा समाजाच्या आरक्षणाची धग कायमच ? --

         माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांनी लग्न सोहळ्यासाठी हे दिनांक १७ मार्च २०२४ रोजी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे गेले असता काही आज्ञात आंदोलकानी एम एच २६ बी सी ७७७१ ही गाडी फोडली आहे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गद्दारी करून या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चाळीस आमदारानी महाविकास आघाडीचे सरकार कोसळून टाकले होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे लग्न सोहळ्यात बसले होते असे सांगण्यात येते त्या दरम्यान दिनांक १७ मार्च २०२४ रोजी दुपारी दोन ते सवा दोनच्या दरम्यान त्यांच्या गाडीवर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली सदरील वाहनाच्या काचा फोडल्या गेल्या आहेत

सरकारकडे सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे अजून ही ग्रामीण भागात मराठा समाजाच्या आरक्षणाची धग कायम असल्याचे स्पष्ट चित्र सदरच्या घटने वरून दिसून येत आहे

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्यामुळे निवडणूक विभागाने आचारसंहिता ही जाहीर केली लोकप्रतिनिधीं कडील पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येते आहे

सकल मराठा समाजाला सरसकट देण्यात यावे अशा प्रकारच्या घोषणा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर त्यांची पांढऱ्या रंगाची गाडी फोडली असल्याची घटना घडताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे 




Post a Comment

0 Comments