शहरात आज रोजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरदचंद्र जऱ्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे, आदिनाथ पाटील, नंदलाल चौधरी,
कदम मॅडम , कुलकर्णी सुरकुंडे.यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच रमजान ईद व ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य मार्गाने पोलीस कर्मचाऱ्यांचे पथसंचलन फेरी काढून शहरातील नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे पथसंचलन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीआहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पथसंचलन करुन, समाजा-समाजात जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी पोलीस स्थानकांकडून शहरातील मुख्य रस्त्याने पोलीसांनी पथसंचलन फेरी काढण्यात आली आहे. त्या पोलिस पथसंचलन फेरीमध्ये ०४-पोलीस अधिकारी, १३-पोलीस अमंलदार तसेच सीआरपीएफचे ५१ जवाना सह गृहरक्षक दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन, शहरातील मुख्य रस्त्याने पथसंचलन फेरी काढण्यात आल्याने गुन्हेगारीवर वचक निर्माण होऊन निवडणूक काळात अप्रिय घटना टाळल्या जातील काय? हे पाहणे औचुकतेचे ठरणार आहे.

0 Comments