Header Ads Widget

दिनांक २४ मार्च रोजी चलो अंतरवाली सराटी चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

नायगाव फास्ट नेटवर्क - 
मराठा आरक्षण व संगें सोयऱ्यांची अमलबजावणी करण्यात यावी व मोर्चाच्या दरम्यान खोटे गुन्हे दाखल झालेले मागे घेण्यात यावे व हैद्राबाद गॅजेट तपासावे अशा विविध बाबीवर चर्चा करण्यात येणार आहेत 

मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून पुढील दिशा ठरवण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली विराट राज्यव्यापी निर्णय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

तरी या सभेला मराठा आरक्षण व संगें सोयऱ्यांची अंमलबजावण व अनेक विषया च्या संदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन व दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे

तरी नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नायगाव तालुका समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दशरथ पाटील पवार होटाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आव्हान केले आहे

Post a Comment

0 Comments