हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायतनगर शहरात अवैध धंद्यांनी कळस गाठला असल्याची चर्चा जोर धरित असून यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्या शक्यता नाकरता येत नसल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी लक्ष देण्याची गरज आहे
स्थानिक पोलीस प्रशासनाचा या सर्व अवैध धंद्यांना पाठबळ आहे की काय अशी चर्चा होताना ऐका लवयास मिळत असून सदरच्या चर्चेचे शहरात मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे
पोलीस प्रशासना पासून ते जिल्हा प्रशासनानी या कडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे शहरात मोठया तोऱ्यात कर्मचारी व अवैध धंदेवाले शहरात वावरताना दिसत आहेत
शहरात दोन ते तीन कम्प्युटर मटके,चार गोटी पाच गोटी मटका,जुगाराचे क्लब शहरातून दिवसा ढवळ्या अवैध देशी दारू वाहतुक होत असताना दारू बंदी अधिकारी झोपेचे सोंग बसले आहेत तर अवैध गुटखा विक्री होत असताना भेसळ अधिकारी नेमके करतात तरी असा प्रश्न विचारला जात आहे
अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे आरटीओ विभाग नेमक करते काय असा ही प्रश्न पडला असून अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात जोमात होताना दिसते तर संबंधित तहसीलदार हे काय करते हा महत्वाचा प्रश्न पडला आहे
पोलीस प्रशासन व इतर विभागाचे अधिकारी खुले आम चालणाऱ्या अवैध धंद्याकडे लक्ष देतील का ? हे पाहावे लागेल असे ही जनतेतून बोलल्या जात आहे

0 Comments