लोहा न्यायालयाने पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पोलीस स्टेशन लोहा यांना आदेशित केले आहे अशा आशयाची एक ऑनलाईन खोटी बातमी प्रसारित करण्यात होती
मात्र सदरची बातमी ही सुड बुद्धीने लावण्यात आली असून लोहा न्यायालयाने पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करा असे कोणते ही आदेश दिले नाहीत
लोहा पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीवर चार गुन्हे दाखल असून त्याचा तडीपरीचा प्रस्ताव लोहा पोलिसांनी पाठवलेला आहे
लोहा न्यायालया मध्ये पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या बद्दल तक्रार केलेली होती सदरची तक्रार दिनांक ७ / ३/२०२४ रोजी करण्यात आली होती
सदरची तक्रार न्यायालयाने चौकशी मध्ये घेतली असून सदरची तक्रार हे खरी आहे का खोटी आहे हे तपासण्यासाठी व्हेरिफिकेशन साठी ठेवलेली होती त्या मध्ये पुन्हा १२/३/२०२४ तारीख देण्यात आली होती पुन्हा त्यात १८/३/२०२४ तारीख ठेवण्यात आली होती.या मध्ये पुन्हा १८ तारखेला माननीय न्यायालयाने २० /४/ २०२४ ही तारीख पुन्हा सुनावणीसाठी ठेवलेली आहे
अजून या प्रकारात न्यायालयाने कोणता ही अंतिम आदेश दिलेला नाही याची पुढील तारीख २० /४ २०२४ आहे.
दिनांक १८/३/२०२४ रोजी न्यायालयाने पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून पोलीस स्टेशन लोहा यांच्याकडे कोणते ही आदेश पाठवलेले नाहीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत ही बातमी खोडसळ पणाने प्रकाशित करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला lआहे.
पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १९७ प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९४९ कलम १५९ १६०,१६१, प्रमाणे संरक्षण दिलेले आहे
या कलम अन्वये पलिसांविरोधात कोणताही दावा किंवा कोणताही खटला डायरेक्ट दाखल करता येत नाही. न्यायालयाला पण पोलिसा विरोधात लोकसेवका विरोधात किंवा स्वतः न्यायालयाच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करून घेता येत नाही.
जर अशी कारवाई करायचीच असेल तर त्यासाठी पोलीस विभागा कडून १९७ सीआरपीसी प्रमाणे पोलीस विभाग प्रमुखां कडून रीतसर परवानगी घ्यावी लागते
म्हणजे कोणत्या ही प्रकारची प्रथम चौकशी हे पोलीस विभागा तर्फेच केली जाते
आता या संबंधाने जे प्रकरण लोहा न्यायालया मध्ये आहे त्या संबंधाने कोणता ही अंतिम आदेश झालेला नाही त्याची पुढील तारीख २०/४/२४ आहे

0 Comments