Header Ads Widget

हिमायतनगर पोलीसांची सात दिवसांत तिसरी मोठी कारवाई. किरण बिच्चेवार यांच्या कडून कौतुक तर जनावरांची तेलंगणात केली जात होती निर्दयपणे वाहतूक !!

हिमायतनगर  : नागोराव शिंदे

हिमायतनगर  सकाळी हिमायतनगर येथे ४. ३० मिनिटांनी वाजताच्या सुमारास एका मुस्लिम व भक्ताने दिलेली माहिती आम्ही ११२ वर कॉल करून पोलिसांना कळवली होती.

हिमायतनगर पोलीस स्टेशन येथील श्री नागरगोजे , गायकवाड ,यांनी पोलीस निरीक्षक श्री जराड  यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दोन्ही वाहनं MH२६BE१८१३आणि एम एच २९ बी ई ४५७२पकडून २३ गोवंशास जीवनदान दिले आहे 

सदरील गोवंश आणि यापुर्वी देखील नांदेड जिल्ह्यात झालेल्या विविध कारवाई मध्ये जप्त केलेले गोवंश हे मोठ्या प्रमाणावर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथुन कत्तलीसाठी तेलंगणामध्ये तस्करी करत आहेत. 

या कामि हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या तपासणी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कोमल कांगने, शामसुंदर नागरगोजे,पवन चौंदते एनपीसी यांनी आरोपी शेख सुलतान शेख अल्लिवली वय वर्षे २८ रा

सुकळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ, अक्रम खान उस्मान खान वय ५४ वर्ष राहणार जामा मजीद उमरखेड जिल्हा यवतमाळ शेख फेजान शेख निसार वय वर्षे 16 हाल्ली मुक्काम उमरखेड यांच्यावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुर नंबर ७०/ २०२४ कलम -- असा गुन्हा दाखल केला असल्याने किरण बिच्चेवार यांनी  पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे

 कि संबंधित गोतस्करांचे जे रॅकेट आहे, त्याची सखोल चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. विदर्भातुन होत असलेल्या गोवंशाच्या तस्करी संदर्भात आम्ही माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य व माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे रीतसर निवेदन देऊन या तस्करांचा पर्दाफाश करण्याची विनंती किरण बिच्चेवार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments