Header Ads Widget

नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार धम्मप्रियाताई गायकवाड तहसील प्रशासन चालवण्यात नंबर वन !!

                 माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका हा ८९ गावा नुसार सदरचा तालुका उभारण्यात आला असल्यामुळे व निर्मिती केली असल्याने ह्या तहसील कार्यालयासाठी सलग तिसऱ्यांदा महिला तहसीलदार म्हणून तत्कालीन महिला तहसीलदार सुरेखाताई नांदे यांच्या नंतर महिला तहसीलदार म्हणून मंजुषाताई भगत ह्या लाभल्या आहेत

त्यानंतर सध्याच्या नायगावच्या महिला तहसीलदार डॉ धम्म प्रियाताई गायकवाड यांच्या माध्यमातून सदरचे नायगावचे तहसील प्रशासन नंबर वन चालत असल्यामुळे शेतकरी असो की जन सामान्य माणूस असो त्यांच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करीत आहे

जिल्ह्यातील नायगावच्या तहसील कार्यालयाचा पदभार स्वीकारल्या पासून नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार डॉ धम्म प्रियाताई गायकवाड यांनी गोरगरीब जनसामान्य माणसाच्या अडी अडचणी लक्षात घेऊन सदरचे कामे मार्गे लावण्यासाठी तहसील मधील अधिकारी असो की कर्मचारी यांना तात्काळ कामे सुरळीत करण्याच्या संदर्भात सूचना देऊन लोकांच्या अडचणी सोडीत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

नायगावच्या कर्तव्यनिष्ठ असलेल्या महिला तहसीलदार डॉ धम्म प्रियाताई गायकवाड यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूककी बरोबर तालुक्यात उद्भभवणाऱ्या पाणी टंचाईच्या संदर्भात पंचायत समिती व महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्यासाठी वेळोवेळी सूचना करत आहेत

सदरच्या महिला तहसीलदार यांनी आपलं तहसील प्रशासन कमालीचे सज्ज ठेवले असल्याने महिला तहसीलदार डॉ. धम्मप्रियाताई यांच्या कोतुकास्पद कामगिरीवर महिला वर्गासह जन सामान्य माणस समाधान व्यक्त करीत आहे 

Post a Comment

0 Comments